शबनम न्यूज | प्रतिनिधी
नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, वह्यांचे वाटप करण्यात आले .
संकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. चे सर्वेसर्वा प्रोप्रायटर मा . संदिपजी तापकीर यांचे मार्फत ४२ गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, २०० पानी व १०० पानी वह्या यांचे वाटप करण्यात आले . यावेळी कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे श्री वाल्हेकर सर मा . प्राचार्य श्री वाघेश्वर विद्यालय चऱ्होली, मा. श्री. परेश कटारिया प्रोप्रायटर परेश टेक्सटाईन उपस्थित होते . यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना मोलाची मदत झाली .या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला.
विद्यालयाचे प्राचार्य मा .सानप सर, उपमुख्याध्यापिका मा .नाणेकर मॅडम, पर्यवेक्षिका मा .ठोंबरे मॅडम व पर्यवेक्षिका मा .पंडित मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमासाठी श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका मा . पंडित मॅडम यांनी केले .प्रमुख पाहुणे श्री वाल्हेकर सर मा . प्राचार्य श्री वाघेश्वर विद्यालय चऱ्होली, यांनी संकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि विषयी माहिती दिली .गेले अनेक वर्ष या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करत असतात . मा . बुरुड मॅडम यांनी सूत्रसंचलन केले .मा . शेवाळे मॅडम यांनी आभार मानले .


