spot_img
spot_img
spot_img

दिघीत १६ हजारांच्या विदेशी दारूसाठ्यावर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

दिघी परिसरात बेकायदेशीररित्या विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका व्यक्तीवर दिघी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई खंडोबा मंदिर परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव आदिकराव भिसे (वय ३०, रा. चौधरी पार्क, दिघी) याच्याकडे १६ हजार ५०० रुपयांचा विदेशी दारूचा साठा कोणताही परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला आढळून आला. पोलिसांनी दारूसाठा जप्त करून आरोपीविरुद्ध कारवाई केली.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!