spot_img
spot_img
spot_img

चिखलीत अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; दारूसाठा जप्त, एकावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

चिखली परिसरातील देहू-आळंदी रोडवरील हॉटेल सहारा येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी छापा टाकून दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश दाहू दास (वय ३५) याच्याकडे विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेल्या ४ हजार ५२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या तसेच ५९० रुपये रोख, असा एकूण ५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी (प्रोव्हिबिशन) कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला बीएनएसएस कलम ३५(३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!