spot_img
spot_img
spot_img

दोन नागरिकांकडून अडीच लाखांहून अधिक रक्कम उकळल्याप्रकरणी गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून देत देशातील दोन नागरिकांकडून अडीच लाखांहून अधिक रक्कम उकळल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल संताजी माने यांच्या नावाने उघडलेल्या आयडीएफसी बँकेच्या खात्याचा वापर आरोपीने साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीसाठी केला. संबंधित खात्यातून सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, देशातील दोन नागरिकांकडून एकूण २ लाख ४९ हजार ८५४ रुपये फसवणुकीद्वारे स्वीकारल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर फसवणूक रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!