पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चऱ्होली बायपास रोडवरील प्लुमेरिया मंगल कार्यालयासमोर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल संतोष हिवाळे (वय २६, रा. आळंदी) याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसताना सुमारे १८ इंच लांबीचा लोखंडी कोयता आढळून आला. पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या मनाई आदेशानुसार कार्यक्षेत्रात घातक शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही आरोपी कोयता घेऊन फिरत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.



