spot_img
spot_img
spot_img

आमदार अमित गोरखे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पिंपरी विधानसभेमध्ये आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिंचवड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील नोवेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष भेट दिली आणि आमदार अमित गोरखे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ
ठीक सकाळी ९.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी मतदारसंघात राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आणि गरजू रुग्णांना जीवनदान देणारा आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी भेटीदरम्यान व्यक्त केला.

या प्रसंगी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे,  राजेश पिल्ले, सभापती संजय नाना काटे, सभापती  कैलास कुटे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेवक कुशाग्र कदम, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका सौ. सुप्रिया चांदगुडे, नगरसेविका सौ. शैलजा मोरे, नगरसेविका सौ. मधुरा शिंदे, प्रसाद शेट्टी,  अमित बाबर,  नेताजी शिंदे तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार अमित गोरखे यांच्या वतीने आयोजित हे शिबिर आज सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक कार्यातकार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे आणि नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांनी केले आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!