शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीपूर्ती निमित्त “विचार प्रबोधन पर्व” या विशेष उपक्रमाचे आयोजन मोरवाडी चौक, पिंपरी व नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे करण्यात आले आहे. रविवार ३१ मे रोजी विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रबोधन पर्वाची सुरुवात रविवार ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० मिनिटांनी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यापक कार्य व प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे हे देखील उपस्थित असणार आहेत.
या विचार प्रबोधन पर्वाअंतर्गत रविवार ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्राची प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारा भव्य सेटवरील ‘सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कोल्हापूर येथील ७५ कलाकार आपल्या सहकाऱ्यांसोबत धनगरीनृत्य, भूपाळी, वासुदेव. पिंगळा, वाघ्या मुरळी, शाहिरी पोवाडे, आदिवासी, डोंबारी अशा विविध व्यक्तीछटा सदर करणार आहेत. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे दर्शन घडणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार प्रबोधन पर्वात महापालिकेतर्फे आयोजित करण्यात करण्यात आलेले हे सर्व कार्यक्रम सर्वासाठी खुले तसेच विनामूल्य आहेत. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्याग,पराक्रमाचा इतिहास अनुभवावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमांचे वेळापत्रक – रविवार ३१ मे २०२६
१) सकाळी ८.३० वा.- ‘गजनृत्य’ सादरकर्ते –
श्री.अंबादास पडळकर व ३० सहकारी
स्थळ – मोरवाडी चौक, पिंपरी
२) सकाळी ९.०० वा- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना ढोलपथकाद्वारे अनोखे अभिवादन
सादरकर्ते – सामना ढोलपथक, मुंबई
स्थळ – मोरवाडी चौक, पिंपरी
३) सकाळी १०.३० वा. – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन हस्ते – मा. महापौर
स्थळ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत
४) सकाळी १०.४५ वा.- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून अभिवादन हस्ते – मा. महापौर
स्थळ – मोरवाडी चौक, पिंपरी
५) सकाळी ११.०० वा. – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून अभिवादन हस्ते – मा. महापौर
स्थळ – सांगवी
६) दु. १२.३० वा.- ‘सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव’ हा महाराष्ट्राची प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारा लोकोत्सव कार्यक्रम
(भूपाळी, वासुदेव. पिंगळा, वाघ्या मुरळी, धनगरीनृत्य, शाहिरी पोवाडे, आदिवासी, डोंबारी असे विविध व्यक्तीछटा)
स्थळ – मोरवाडी चौक, पिंपरी
७) दु. २.३० वा. – शाहिरी कार्यक्रम
सादरकर्ते – शाहीर श्री. सुरेश जाधव व सहकारी,
छत्रपती संभाजीनगर
स्थळ – मोरवाडी चौक, पिंपरी
८) रात्री ९.०० वा. – “पुण्यश्लोक ” हे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे दर्शन घडविणारे ७५ कलाकारांचे महानाट्य…
सादरकर्ते – पुण्यश्लोक फाउंडेशन, महाराष्ट्र
स्थळ – नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी
या सर्व कार्यक्रमांस शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.


