spot_img
spot_img
spot_img

एक्सप्रेसवे लगत हातभट्टी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; १ लाख ४० हजारांचे रसायन जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत शिरगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी घटनास्थळावरून पसार झाली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास शिरगाव गाव हद्दीतील मुंबई-पुणे एक्सप्रेसवे लगत असलेल्या एका खड्ड्याजवळ अवैध हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

छाप्यामध्ये राधिका कुमार नानावत (रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे) ही महिला हातभट्टी दारू निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन भिजत घालून ठेवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच संबंधित महिला आरोपीने तेथून पळ काढला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन जप्त करून नष्ट केले. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार महिला आरोपीचा शोध सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!