spot_img
spot_img
spot_img

कलाकारांचा सन्मान आणि सिने सृष्टीच्या विकासासाठी समर्थ पॅनलला पाठिंबा – भाऊसाहेब भोईर

मराठी चित्रपट आणि कलाकारांच्या विकासासाठी समर्थ पॅनल सक्षम – मेघराज राजे भोसले
शबनम न्यूज | प्रतिनिधी
कलाकारांचा सन्मान आणि सिने सृष्टीच्या विकासासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले.
   अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी ७ जून रोजी मतदान होणार आहे. या निमित्त शनिवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर बोलत होते. यावेळी समर्थ पॅनलचे निर्माता पदाचे अधिकृत उमेदवार मेघराज राजे भोसले, सुनील महाजन, दिग्दर्शक पदाचे उमेदवार अजित शिरोळे, लेखक पदाचे उमेदवार राज काझी तसेच गौरी लोंढे, संजय ठुबे आदी उपस्थित होते. 
   यावेळी नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व घटकांना एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी समर्थ पॅनल कार्यरत राहील. मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी समर्थ पॅनलला सर्व सभासद भरघोस मतदान करतील असा विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
   मेघराज राजे भोसले यांनी सांगितले की, मराठी चित्रपट आणि कलाकारांच्या विकासासाठी समर्थ पॅनल आता सक्षम आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा विकास हे ध्येय समोर ठेवून भाऊसाहेब भोईर यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन निर्माता गटाच्या दुसऱ्या पदासाठीचे उमेदवार सुनील महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला, असे मोठ्या मनाचे आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे भाऊसाहेब भोईर यांचा पाठिंब्यामुळे समर्थ पॅनल आता आणखी समर्थ झाले आहे. मराठी चित्रपट सृष्टीच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे अनुभवी, अभ्यासू आणि कार्यक्षम उमेदवार समर्थ पॅनल तर्फे निवडणूकीत उभे राहिले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कामगार आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना न्याय देणारे प्रभावी नेतृत्व मिळावे, या उद्देशाने “कलाकारांचा सन्मान – मराठी सिनेसृष्टीचा विकास” हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहे. या सर्व उमेदवारांना पतंग या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन पॅनल प्रमुख ज्येष्ठ निर्माता गटाचे उमेदवार मेघराज राजे भोसले यांनी केले.
    समर्थ पॅनल मधील इतर अधिकृत उमेदवार निर्माता गटाच्या दुसऱ्या पदासाठी सुनील महाजन, दिग्दर्शक पदासाठी दीपक कदम (मुंबई), अभिनेता पदासाठी सुशांत शेलार (मुंबई), छायाचित्रण पदासाठी धनाजी यमकर (कोल्हापूर), नृत्य पदासाठी सुभाष नकाशे (मुंबई), ध्वनी पदासाठी शरद चव्हाण (कोल्हापूर), कलादिग्दर्शक प्रवीण (वासू) पाटील (सातारा), वेशभूषा पदासाठी चैत्राली डोंगरे (मुंबई), निर्मिती व्यवस्था पदासाठी रवी गावडे (कोल्हापूर), प्रसिद्धी पदासाठी गणेश गारगोटे (मुंबई), कामगार पदासाठी विकास तोरणे (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
    समर्थ पॅनलने मराठी चित्रपट सृष्टी समोरील विविध प्रश्न सोडविणे, कलाकार व तंत्रज्ञांच्या हक्कांचे संरक्षण करणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, डिजिटल माध्यमांशी सुसंगत धोरणे राबविणे, तसेच महामंडळ अधिक सक्षम आणि पारदर्शक बनविणे यासाठी कटिबद्ध असल्याचे सुनील महाजन यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!