शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या हातभट्टी दारू विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजण्याच्या सुमारास डोंगरवस्ती, मौजे निघोजे (ता. खेड, जि. पुणे) येथील पिनेकल डायीज अॅण्ड मोल्ड प्रा. लि. कंपनीसमोरील पत्र्याच्या शेडजवळ ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी नितीन धोंडीबा गायकवाड (वय ५३, रा. जयभीम वस्ती, निघोजे, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बीएनएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
फिर्यादी पोलीस शिपाई प्रशांत जयंत कसबे (बकल नं. ३०५७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा आपल्या ताब्यात सुमारे १०,००० रुपये किमतीची हातभट्टी दारू बेकायदेशीरपणे व विनापरवाना विक्रीसाठी ठेवून असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलीस शिपाई बांबळे यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


