spot_img
spot_img
spot_img

‘देऊळ बंद २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सहा दिवसांत २४.६७ कोटींची कमाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी पहाटे साडेपाच वाजताचा शो हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या सहा दिवसांत ‘देऊळ बंद २’ने तब्बल २४.६७ कोटी रुपयांची कमाई केली असून, हा चित्रपट आता अधिकृतपणे ब्लॉकबस्टर ठरला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमाचं बजेट सुमारे ८ ते १० कोटी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बजेटपेक्षा दुप्पट कमाई करत चित्रपटाने मोठं यश मिळवलं आहे.

२०२६ मध्ये अशी दमदार कामगिरी करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी Riteish Deshmukh दिग्दर्शित Raja Shivaji या सिनेमाने पहिल्या सहा दिवसांत ५१.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वतः रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत प्रवीण आणि स्नेहल तरडे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते Mohan Joshi यांचं विशेष कौतुक केलं.

चित्रपटाच्या कमाईचे आकडेही लक्षवेधी ठरले आहेत. पहिल्या दिवशी ३.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.११ कोटी, तिसऱ्या दिवशी ५.२१ कोटी, चौथ्या दिवशी ६.१० कोटी, पाचव्या दिवशी ३.७० कोटी तर सहाव्या दिवशी ३.५० कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने सहा दिवसांत एकूण २४.६७ कोटींचा गल्ला जमावला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!