शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील परंदवडी ब्रिजजवळ अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ११.९३० ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रसाद राजन्ना जंगिलवाड (वय ३८,पोलीस शिपाई, शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी हर्षल गोविंदराव जाधव (वय २०, रा. डेफोडिल्स ३०७, सोमाटणे फाटा, ता. मावळ), निखिल उत्तम बेलगट (रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) आणि प्रतीक ऊर्फ सोहम ऊर्फ बाबा अंतमवान पवार (रा. काळेवाडी, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३४ वाजण्याच्या सुमारास मौजे परंदवडी ब्रिजजवळ महामार्गाच्या कडेला ही घटना घडली. आरोपींच्या ताब्यात ११ हजार ९३० रुपये किमतीचा ११.९३० ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगलेला आढळून आला. पोलिसांनी हा अमली पदार्थ जप्त केला असून आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २१(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे मावळ परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.




Total Users : 241716