spot_img
spot_img
spot_img

कंपनीत कामाच्या वादातून सहकाऱ्याने केली मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कंपनीत काम व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून सहकाऱ्याशी झालेल्या वादातून एका कामगाराच्या कपाळावर हाताने मारहाण करून त्याला जखमी केल्याची घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली.

याप्रकरणी संजय गजराज जयस्वाल (वय ४६, रा. वडगाव रोड, चऱ्होली खुर्द, आळंदी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. गौरव रामपदा सरकार (वय ३९, रा. भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जय इंडस्ट्रीज, जे ब्लॉक, एमआयडीसी भोसरी येथे ही घटना घडली. फिर्यादी कंपनीमध्ये काम करीत असताना आरोपीने त्यांना तुम्ही जॉब व्यवस्थित करीत नाही, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी आपण काम व्यवस्थित करीत असल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने हाताने फिर्यादीच्या कपाळावर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!