शबनम न्यूज | प्रतिनिधी
मुलासह पायी रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने आई आणि मुलगा खाली पडून जखमी झाल्याची घटना मोशीतील भारतमाता चौक परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीचालक महिलेविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पल्लवी संतोष व्हनखंडे (वय ३५, रा.गंधर्वनगरी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीएस ज्युपिटर (एमएच १४ जेडी ४६८१) या दुचाकीवरील चालक जरीना फिरोज खान (वय ३६, रा. देहूरोड) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भारतमाता चौक, मोशी येथे पल्लवी व्हनखंडे या त्यांचा मुलगा शिवांश याच्यासह पायी रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने दुचाकी निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली. दुचाकीची आई-मुलाला धडक बसल्याने दोघेही खाली पडले.
या अपघातात फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या कोपराला आणि उजव्या पायाच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली. तसेच मुलगा शिवांश याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.




Total Users : 241710