शबनम न्यूज | प्रतिनिधी
हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी जमवून त्यांना हुक्का पिण्यासाठी देत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सागर शंकर पावडे (वय २९, पोलीस शिपाई, नेमणूक बावधन पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी शुभम देवानंद माझिरे (वय २९, रा. मुक्ताई लॉन्सशेजारी, भुकूम, ता. मुळशी) आणि अर्जुन नामदेव वेताळ (वय २३, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भुकूम येथील थलासो हॉटेल, मानस तलावाशेजारी ही कारवाई करण्यात आली. आरोपी हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी जमवून त्यांना एकत्र बसवून हुक्का पिण्यास देत होते. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही हुक्का पॉट व हुक्का फ्लेवरची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत एक हुक्का पॉट, एक हुक्का पाईप व इतर साहित्य असा एकूण ३ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 241726