spot_img
spot_img
spot_img

गॅस कटरने एटीएम मशीन फोडले; २० लाख ३० हजारांची रोकड लंपास

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर परिसरात चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यातील तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरी करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.

याप्रकरणी तपब्रत जिबोतोष चक्रवर्ती (वय ३४, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजण्यापूर्वी पिंपळे गुरव येथील शेतायन समृद्धी कॉलनीतील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून हायसंग कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापले. त्यानंतर मशीनमध्ये ठेवलेली २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. चोरी करताना एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारण्यात आला, जेणेकरून चोरट्यांची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत, असा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेमुळे पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरात खळबळ उडाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!