spot_img
spot_img
spot_img

जुन्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. टोळक्याने लोखंडी कोयत्याने तरुणाच्या डोक्यावर वार करून त्याचा पाठलाग केल्याची घटना चिखलीतील मोरेवस्ती परिसरात घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विजय रघुनाथ सातपुते (वय २६, रा.मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका महिला आरोपीसह विशाल डाबेराव (वय २३, रा. मोरेवस्ती, चिखली), साहिल अतुल महिंद्र (वय १८, रा. घरकुल) आणि मोहिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९.२६ वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्यम कोर्ट यार्ड बिल्डिंग, नेवाळेवस्ती, चिखली येथील शिवशक्ती किराणा दुकानासमोर ही घटना घडली. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपापसांत संगनमत केले. त्यानंतर एका आरोपीने शर्टमधून लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. मात्र, फिर्यादीने तो वार चुकवला. यानंतर फिर्यादीने मोटारसायकल घेऊन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्याच्या समोरील बाजूने आरोपी क्रमांक दोन ते चार यांनीही त्याला जिवंत सोडणार नसल्याची धमकी देत पाठलाग केला. आरोपींनी शिवीगाळ करत दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!