spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला!

भाजपचे सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन स्वीकृत नगरसेवक निश्चित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा अनेक महिन्यांपासून रखडलेला तिढा अखेर सुटला आहे. राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत रस्सीखेच आणि इच्छुकांची मोठी गर्दी यामुळे चर्चेत असलेल्या या निवड प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन अशा एकूण दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.

भाजपकडून सचिन साठे, राजेश पिल्ले, जयनाथ काटे, ऋषिकेश मेत्रे, कुणाल लांडगे, विशाल आप्पा कलाटे आणि कुलदीप परांडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीमा सावळे, फझल शेख आणि राजेंद्र जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. तब्बल दीडशेपेक्षा अधिक इच्छुकांमधून केवळ सात जणांची निवड करणे पक्ष नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरले होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी नावांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर इच्छुकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे.

या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात महापालिकेच्या सभागृहातील राजकीय समीकरणे, विकासकामांवरील चर्चा आणि सत्ताधारी-विरोधकांमधील राजकीय संघर्षात या दहा स्वीकृत नगरसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नव्या नगरसेवकांकडून शहराच्या विकासासाठी कोणते मुद्दे मांडले जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!