शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका’,‘थिएटर वर्कशॉप कंपनी’ आणि ‘पैस कल्चरल फाऊंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक कलांचा समावेश असलेला ‘रंगानुभूतिःपुर्वरंग ते उत्तररंग’ हा राष्ट्रीय महोत्सव शनिवार दि. २१ नोव्हेंबर २०२६ ते २४ नोव्हेंबर २०२६ या दरम्यान ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण(निगडी)येथे संपन्न होत आहे. महोत्सवात पूर्वरंगात नांदीसह नाट्यगीतांचा सांगितिक कार्यक्रमृ, तर उत्तररंगात देशभरातील राष्ट्रीय नाट्य महोत्सवात वर्णी लागलेले ५ नाट्यप्रयोग, दिग्गज रंगकर्मींचे ५ अभ्यासर्ग, कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने विशेष काव्यात्मक कार्यक्रम, रंगमंथन परिसंवाद,चित्र-शिल्प प्रदर्शन अशी रेलचेल अनुभवायला मिळणार आहे,अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारुढ पक्षनेता प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे,उपायुक्त अण्णा बोदडे,जणसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाऊंडेशनचे संचालक प्रभाकर पवार उपस्थित होते.
या राष्ट्रीय नाट्यप्रयोगकला महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतभरातून उत्तमोत्तम प्रयोगकला अभिनव पद्धतीने सादर करणाऱ्या निवडक संस्थांना आपण आमंत्रित करत असतो. यामध्ये कलकत्ता, केरळ, आसाम, ओरिसा, दिल्ली, मुंबई, पुण्यातून प्रयोगकला सादर करण्यासाठी निमंत्रित रंगकर्मी आणि अभ्यासक येत आहेत. या महोत्सवादरम्यान दिला जाणार यावर्षीच्या रंगानुभूति सन्मानासाठी जेष्ठ रंगकर्मी वामन पंडीत (कणकवली) यांची निवड केली आहे. तसेच यामध्ये शिल्पकला, चित्रकलांसह या शहराचा सांस्कृतिक वारसा मांडणारे प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने मांडले जाणार आहे. स्थानिक पातळीवरील विद्यालये, महाविद्यालयांसह सांस्कृतिक, सामाजिक संस्थांच्या सहभागाने या महोत्सवात परिसंवाद, कार्यशाळांसह अनेक विविध उपक्रमांचा अंतर्भाव केला आहे.
या महोत्सवादरम्यान राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली (एनएसडी) चे संचालक चित्तरंजन त्रिपाठी, जेष्ठ नाटककार जब्बार पटेल, जेष्ठ नाटककारसतीश आळेकर, भारतीय चित्रपट आणि दुरदर्शन संस्थेचे (FTII) माजी विभागप्रमुख प्रा.समर नखाते, पुणे विद्यापीठाच्या ललीत कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांची उपस्थिती असेल.
महोत्सवात आयोजित रंगमंथन परिसंवादात ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वेलणकर, शाम पेठकर यांच्याशी संवाद होणार आहे. या राष्ट्रीय महोत्सवासाठी मार्गदर्शक व सल्लागार म्हणून जेष्ठ नाटककारजब्बार पटेल, जेष्ठ नाटककारसतीश आळेकर, भारतीय चित्रपट आणि दुरदर्शन संस्थेचे (FTII) माजी विभागप्रमुख प्रा. समर नखाते आहेत. शिवाय पुणे विद्यापीठाच्या ललीत कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्या सहकार्यातून याची रुपरेषा ठरली आहे. या महोत्सवादरम्यान दिला जाणार यावर्षीच्या रंगानुभूति सन्मानासाठी जेष्ठ रंगकर्मी वामन पंडीत (कणकवली) यांची निवड केली आहे.
हा महोत्सव सर्वांना विनामुल्य खुला असून सर्वांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.




Total Users : 242034