शबनम न्यूज | प्रतिनिधी
किराणा मालाच्या दुकानासमोर पार्क करून ठेवलेली सुमारे एक लाख रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना आंबेठाण परिसरात घडली असून उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नवनाथ रामदास बाजारे (वय ४२, व्यवसाय-शेती, रा. बाजारे वस्ती, करंजविहीरे, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची सुमारे एक लाख रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० मोटारसायकल, क्रमांक MH 13 EW 5322, ही १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास रामेश्वरनगर कमानीजवळील आंबेठाण येथे किराणा मालाच्या दुकानासमोर हँडल लॉक करून पार्क करण्यात आली होती.
फिर्यादींच्या संमतीशिवाय अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.




Total Users : 228679