डोक्यात बीअरची बाटली फोडल्याचा आरोप; चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. चार अनोळखी व्यक्तींनी तरुणाला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने डोक्यात बीअरची बाटली फोडल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता हॉटेल सरपंच मळा, शेलारवस्ती, चिखली येथे घडली. गुन्हा ४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३५ वाजता दाखल करण्यात आला.
आदित्य भगवान कळमकर (वय २८, व्यवसाय-व्यवसाय, रा. चिखली गावठाण, टाळ मंदिराजवळ, चिखली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्र निलेश कांबळे याच्यासोबत जेवण करण्यासाठी शेलारवस्ती येथील हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी याचा फिर्यादीला धक्का लागला. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.यानंतर चार अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी हॉटेलच्या बाहेर गेल्यानंतरही आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी आरोपी याने फिर्यादीच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली. इतर आरोपींनी अंगावर दगड फेकून मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला, डाव्या खांद्याला, डाव्या पायाला आणि तोंडाला दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी चार अनोळखी आरोपींविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.




Total Users : 228677