शबनम न्यूज | प्रतिनिधी
रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने एका २३ वर्षीय महिलेच्या आजीला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी कारचालकाविरोधात शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवर, ही घटना ४ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता मावळ तालुक्यातील जुना उर्से टोलनाका परिसरात घडली.या प्रकरणात २३ वर्षीय महिला फिर्यादी, व्यवसाय-शिक्षण, रा. नागठाणे, ता. पोलिस जि. सांगली, यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्रथम शशिकांत भोर (वय २२, रा. मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, महिला आपल्या आजोबा व आजीसोबत पुण्याहून मुंबईकडे जात होती. जुना उर्से टोलनाका येथे रस्ता ओलांडत असताना मुंबईच्या दिशेने जाणारी एक पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची कार आली. आरोपीने हयगय व अविचाराने भरधाव वेगात वाहन चालवून फिर्यादीच्या आजी मंगल ईश्वर पाटील यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांना साधी व गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा आरोप कारचालकावर आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 228677