spot_img
spot_img
spot_img

Crime : कंपनीतून २९ हजारांची सोल्डर वायर चोरी; कामगार अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कंपनीत कामगार म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाने कंपनी व्यवस्थापनाची परवानगी न घेता सुमारे २९ हजार रुपये किमतीच्या सोल्डर वायरच्या आठ बंडलची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून चोरीचा माल आरोपीकडून पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फ्लॅश इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. कंपनी, महाळुंगे, ता. खेड येथे घडली.या प्रकरणी आशिष रामचंद्र त्रिभुवन (वय ५४, व्यवसाय-कंपनी नोकरी, रा. सदस्या बी-२०३, कृष्ण क्लासिक सोसायटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी विवेक खनेलाल पासवान (वय २४, रा. सद्या कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे; मूळ गाव कुसरा पोस्ट पचौरी, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तो अटकेत असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कंपनीत कामगार म्हणून नोकरीला होता. कंपनी व्यवस्थापनाची परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने सुमारे २९ हजार रुपये किमतीची सोल्डर वायरची आठ बंडल बॅगेत ठेवून चोरी केली.

कंपनीतून चोरीचा माल घेऊन जात असताना कंपनीचे सुरक्षा रक्षक सुरज गुप्ता आणि एच.आर. विभागातील शुभम बनकर यांनी त्याचा पाठलाग केला. सुरक्षा रक्षकांनी आरोपीला चोरीच्या मालासह पकडले.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!