spot_img
spot_img
spot_img

स्पाइन रोडवरील अनधिकृत पार्किंगविरोधात पोलिस ॲक्शन मोडवर; तुषार सहाणेंच्या निवेदनानंतर तातडीच्या कारवाईचे आदेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्पाइन रोड आणि मोशी परिसरातील वाढत्या अनधिकृत पार्किंग, अवजड कंटेनर्स आणि वाहतूक कोंडीच्या समस्येची अखेर पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक तथा विधी समिती सदस्य तुषार भिवाजी सहाणे यांनी वाहतूक पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख आणि तळवडे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन दिले.

जय गणेश साम्राज्य चौक ते संत नगर चौक, स्पाइन मॉल चौक ते सेक्टर १३ ब्रीज या मार्गावरील सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी वाढत असून, अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, सेक्टर ९, १०, ११ आणि १३ मधील मोकळ्या भूखंडांवर अवजड कंटेनर्स आणि वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्याने स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांमुळे रस्ते अरुंद होत असून रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोलिस प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्देश

तुषार सहाणे यांच्या निवेदनानंतर पोलिस प्रशासनाने या परिसरात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये—

‘नो पार्किंग’ आणि ‘सम-विषम पार्किंग’चे फलक लावणे
‘No Container Parking’चे फलक बसवणे
नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंड व टोईंग कारवाई
सकाळी-सायंकाळी वाहतूक पोलिसांची विशेष गस्त
वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डनची नियुक्ती
अनधिकृतपणे वाहने व कंटेनर्स उभे करणाऱ्यांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे.

“स्पाइन रोड हा अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा मार्ग आहे. अनधिकृत पार्किंग आणि कंटेनर्समुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रभाग हा आमचा मुख्य उद्देश आहे. पोलिस प्रशासनाने तातडीच्या कारवाईचे निर्देश दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,” असे नगरसेवक तुषार सहाणे यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!