spot_img
spot_img
spot_img

एसबीपीसीओएडी महाविद्यालयात पदवीप्रदान सोहळा संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वास्तुशास्त्र म्हणजे संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि भावना यांचे एकत्रीकरण करून उभारलेल्या इमारतीचे प्रतीक असते. विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सामोरे जावे. आपल्या कामाप्रती श्रद्धा, सबुरी आणि साधना या मूल्यांचा जीवनात उपयोग केल्यास यश आणि आनंद अनुभवता येईल असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद गिरीश दोशी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे वास्तूविशारद पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर्किटेक्ट गौरव भांगरे, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन च्या प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, परीक्षा अधिकारी अजय हराळे, इंटरनल सीनियर सुपरवायझर रुजूता पाठक, यशस्वी विद्यार्थी, पालक प्रतिनिधी, प्राध्यापक आदी उपस्थित होते.

गिरीश दोशी यांनी मागील चार दशकांतील त्यांचा वास्तुशास्त्रीय जीवन प्रवास आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेले व्यावसायिक कार्य याचे दुर्मिळ छायाचित्रे दाखवून मार्गदर्शन केले. तसेच एखादी कलाकृती इमारत उभारताना अवकाश, सूर्यप्रकाश, उद्यान आणि डिझाईन यांचा विचार केला पाहिजे. आता आलेल्या नवीन फेरो सिमेंट या प्रकारामुळे वास्तुविशारद क्षेत्राला विविधता प्राप्त झाली आहे असेही सांगितले.

आर्किटेक्ट गौरव भांगरे यांनी सांगितले की, उत्तम वास्तुविशारद होण्यासाठी साधना, संयम आणि सातत्य या मूल्यांचा अंगीकार केला पाहिजे. आता पदवी प्राप्त झाल्यानंतर किमान तीन वर्ष तरी एखाद्या वास्तूविशारद यांच्या अधिपत्याखाली काम करावे. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल. गुरु सोबत असेल तर शिक्षण संपल्यावर सुद्धा शिकता येते. काम करताना क्लायंट, गवंडी सर्वांची मानसिकता जाणून घेणे गरजेचे आहे.
लक्ष्मण तोरगळे, किसन काळे, इतर प्राध्यापक आणि स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
स्वागत प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, सूत्रसंचालन प्रा. शिवा शिशोविया व आभार प्रा. दक्षा देशमुख यांनी मानले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!