वडिलांना जीवे ठार मारल्याची फिर्यादीची तक्रार; चार आरोपी अटकेत
शबनम न्यूज | प्रतिनिधी
नेहरूनगर परिसरात जुन्या वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या चौकोनी फरशीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यानच्या फुटपाथवर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.
या प्रकरणी गणेश प्रभाकर सरकटे (वय २४, रा. फ्लॅट क्रमांक १२१२, आंबेडकरनगर पुनर्वसन वसाहत, नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित ऊर्फ भाऊ जांघ्या प्रकाश धोत्रे, अर्णव ऊर्फ अरव लोकेश ऊर्फ आरब्या, प्रणित प्रशांत निकम (वय १९) आणि सचिन राम साबळे (वय २९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी क्रमांक १, ३ आणि ४ यांना अटक करण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अज्ञात कारणावरून आरोपींनी फिर्यादीचे वडील प्रभाकर कुंडलिक सरकटे (वय ५०) यांच्या डोक्यात सिमेंटच्या चौकोनी आकाराच्या फरशीने मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 228677