spot_img
spot_img
spot_img

माई फाऊंडेशनची ऑक्टोबर महिन्याची मासिक सभा उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

माई फाऊंडेशनची ऑक्टोबर महिन्याची मासिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच संपन्न झाली. या सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड. ममता कांबळे उपस्थित होत्या, तर सभेच्या अध्यक्षस्थानी शिल्पा भालेराव होत्या.

यावेळी ॲड. ममता कांबळे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी संविधान आणि कायद्यातील तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले. महिलांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदेशीर उपाय उपलब्ध असून, गरजेनुसार महिलांनी या कायद्यांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच वैयक्तिक समस्या किंवा कायदेशीर अडचणी असल्यास आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा काळभोर यांनी प्रास्ताविकातून फाऊंडेशनच्या आगामी विविध उपक्रम व संकल्पनांची माहिती दिली. सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या फाऊंडेशनच्या सभासदांचा अनुराधा काळभोर यांच्या हस्ते विशेष भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये सामिना मुलाणी या भाग्यवान विजेत्या ठरल्या.

सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. फाऊंडेशनचे समन्वयक प्रकाश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले, तर सोनाली काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!