spot_img
spot_img
spot_img

हिंजवडी मेट्रोच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार

 प्रवासी, आयटीयन्स आणि नागरिकांशी साधला संवाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावर (वाकड चौक ते माण फेज ३)  सोमवारी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी प्रवास केला . यावेळी त्यांनी  प्रवासी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधण्यात आला. प्रवाशांच्या अडचणी, अपेक्षा आणि विविध मागण्या जाणून घेतल्या. तसेच वाकड मेट्रो स्टेशन परिसरातील कामाची पाहणी करून या मेट्रो मार्गाचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, प्रवास सुलभ व्हावा आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना यावेळी मेट्रो तसेच पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.   

चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी (दि. १६)  हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावर (वाकड चौक ते माण फेज ३) प्रवास केला. यावेळी नागरिकांसह पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL), पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, हिंजवडी मेट्रो हा खऱ्या अर्थाने ‘आयटीयन्स’साठी  मोठा दिलासा आहे. मोठ्या संख्येने आयटीयन्स  या मेट्रोचा उपयोग करत आहेत. शिवाय शहरातील इतर कनेक्टिव्हिटीला या मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या मेट्रो सुविधेमुळे पुनावळे, ताथवडे, वाकड, मामुर्डी,किवळे, रावेत या भागात देखील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे

मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार

आमदार शंकर जगताप म्हणाले, हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गादरम्यान असलेल्या स्थानकांजवळ बहुमजली स्वयंचलित पार्किंग व्यवस्था उभारणे, स्थानकांपासून सुमारे १० किलोमीटर परिसरात नियमित फीडर बस सेवा सुरू करणे, तसेच वाकड मेट्रो स्थानकाचे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील . वाकड स्थानकाला पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, रावेत आणि आळंदी परिसरातील बससेवेशी जोडण्याची सूचनाही करण्यात आली. याशिवाय मेट्रो स्थानकांना निवासी व व्यावसायिक भागांशी जोडणारे सौरऊर्जायुक्त संरक्षित स्कायवॉक उभारणे, बस व मेट्रोचे मार्ग, वेळापत्रक, थेट लोकेशन आणि प्रवासखर्चाची माहिती देणारे एकात्मिक प्रवास नियोजन ॲप विकसित करणे, तसेच मेट्रो आणि फीडर बससाठी एकत्रित तिकीट व सवलतीचे पास उपलब्ध करून देणे. प्रवाशांच्या समस्या आणि सूचनांचा नियमित आढावा घेण्यासाठी मेट्रो–प्रवासी समन्वय समिती स्थापन करणे, तसेच पादचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि सायकलस्वारांसाठी स्थानक परिसर अधिक सुरक्षित व सुलभ करण्यावर भर द्यावा अशी सूचना केलेली आहे. या सर्व सूचनांचा आणि मागण्यांचा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून मेट्रो सेवा अधिक प्रभावी, प्रवासीस्नेही आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो ही केवळ आयटीयन्ससाठीच नव्हे, तर पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सुविधा आहे. या मेट्रोचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळण्यासाठी स्थानकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा, फीडर बस सेवा, पुरेशी पार्किंग व्यवस्था आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांशी समन्वय असणे गरजेचे आहे. वाकड मेट्रो स्थानक हे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागांची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होईल. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासही मदत होईल. यासाठी नागरिकांनी मांडलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

 शंकर जगताप 
आमदार चिंचवड विधानसभा 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!