शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीची सलग पाच दिवस सुट्टी असताना सुट्टी संपल्यावरही सलग जोडून गुरुवार व शुक्रवार मनमानी पद्धतीने सुट्टी घेणाऱ्या बेजबाबदार, मस्तवाल आणि निर्ढावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांना कर्मचारी यांना लाखोंच्यावर गलेलठ्ठ पगार आहे. बोनस लाखांच्या घरात आहे. त्यामुळे हे अधिकारी, कर्मचारी मस्तावाल झालेले आहेत. हे जनतेचे नोकर आहेत. हे विसरलेले आहेत. ही महापालिका करदात्यांच्या पैशावर चालते, हेही हे अधिकारी आणि कर्मचारी विसरलेले आहेत. त्यामुळे दिवाळीची सुट्टी संपल्यावर गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ आणि शुक्रवार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मनमानी पद्धतीने सुट्टी घेतलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर बेजोबदारपणाचा ठपका ठेवून कडक कारवाई करा.
दिवाळीच्या पाच दिवस सुट्टी संपल्यावर गुरुवार आणि शुक्रवारी आपल्या कामासाठी महापालिकेच्या मुख्य इमारती व प्रभाग कार्यालय, कर संकलन कार्यालयात आलेल्या नागरिकांना या बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आयुक्त साहेब आपण कडक कारवाई करावी , जेणेकरुन हे अधिकारी आणि कर्मचारी पुढच्या वेळी असा प्रकार करणार नाहीत, असे निवेदनात नमूद केले आहे.




Total Users : 239741