युवक-युवतींसाठी नोकरी मेळावाही होणार; रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू
शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आकुर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान, रक्त तपासणी, नेत्र तपासणी तसेच मशीनद्वारे बॉडी फॅट तपासणी करण्यात येणार आहे. तसेच युवक व युवतींसाठी विशेष नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एअरबड्स, स्मार्ट वॉच किंवा स्कूल बॅग यापैकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
हे शिबिर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत संत तुकाराम महाराज पालखी तळ, विठ्ठल मंदिरासमोर, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे पिंपरी-चिंचवड शहर उपशहरप्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी केले आहे.
या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी, युवक-युवतींनी तसेच रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




Total Users : 239721