spot_img
spot_img
spot_img

टिपू सुलतान जयंतीसाठी महापालिकेने तातडीने विशेष निधी मंजूर करावा; आगामी अर्थसंकल्पातही स्वतंत्र तरतूद करावी – नरेंद्र बनसोडे

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महापालिका महापौर व आयुक्तांकडे मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

म्हैसूरचे शूर आणि पराक्रमी शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यंदाच्या जयंती उत्सवासाठी तातडीने विशेष निधी मंजूर करावा. तसेच आगामी महानगरपालिका अर्थसंकल्पात दरवर्षी जयंतीनिमित्त स्वतंत्र निधीची कायमस्वरूपी तरतूद करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिका महापौर व आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टिपू सुलतान यांच्या ऐतिहासिक कार्याची, शौर्याची आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेल्या संघर्षाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेने केवळ औपचारिक अभिवादन कार्यक्रम न घेता व्यापक स्वरूपात ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम आयोजित करावेत, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

निवेदनाद्वारे यंदाच्या जयंतीनिमित्त तातडीने विशेष निधी मंजूर करून शहरस्तरीय अभिवादन कार्यक्रम, ऐतिहासिक संदर्भ व्याख्यानमाला, ऐतिहासिक छायाचित्र व डिजिटल माहिती प्रदर्शन आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहेl तसेच सामाजिक सलोखा, सर्वधर्मीय ऐक्य आणि बंधुतेचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करावेत.

यावेळी नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “इतिहासातील शौर्य, स्वाभिमान आणि संघर्षाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यंदाच्या जयंतीसाठी विलंब न करता तातडीने विशेष निधी मंजूर करावा. केवळ यंदाच नव्हे, तर आगामी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करून शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम नियमितपणे राबवावेत.”

महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निधी मंजूर करावा आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!