spot_img
spot_img
spot_img

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयास भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्या पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह संस्थेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था आदी उपस्थित होते.

 

या प्रसंगी केंद्रीय मंत्री शाह यांनी, बीजेएस आणि एसएमएफ यांच्या ४२ प्रवासाची, सामाजिक योगदानाची आणि विविध उपक्रमांची माहिती घेऊन या संस्थांच्या कार्याचे कौतुक केले.

मुथ्था यांनी जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, मूल्यवर्धन कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन तसेच सामाजिक विकासाच्या क्षेत्रांत संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सादर केली.

कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे विश्वस्त वल्लभ भन्साळी, अभय फिरोदिया, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांकला आदी उपस्थित होते.

 

तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि अन्य मान्यवरांनी नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांचे पश्चिम विभागीय कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!