spot_img
spot_img
spot_img

नगरसेविका अश्विनी चिखले-मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त NCMC-ST स्मार्ट कार्ड वाटप 

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कै. प्रकाश (आप्पा) काळभोर आणि कै. गोदावरी रखमाजी काळभोर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या NCMC-ST स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे ८०० नागरिकांनी स्मार्ट कार्डचा लाभ घेतला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रथम महिला नगरसेविका सौ. अश्विनी सचिन चिखले-मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त २ ऑक्टोबर २०२६ पासून या स्मार्ट कार्डचे वाटप सुरू करण्यात आले.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त NCMC-ST स्मार्ट कार्डमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कॅशलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. एसटी, मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना या सुविधेचा लाभ होणार आहे.

शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने वापर करता यावा, हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिनभाऊ चिखले, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!