spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य शिर्डी येथे होणार राष्ट्रीय अधिवेशन

चर्मकार समाजाने बहुसंख्येने सहभागी होऊन अधिवेशन यशस्वी करण्याचे माजी अध्यक्ष संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ. व राष्ट्रीय महासचिव डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांचे आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिर्डी येथे गुरुवार ८ व शुक्रवार ९ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये चर्मकार समाजातील नागरिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी अध्यक्ष संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ व राष्ट्रीय महासचिव डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.
पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या अधिवेशनाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीच्या माध्यमातून शिर्डी येथे गुरुवार ८ व शुक्रवार ९ ऑक्टोबर रोजी हे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील चर्मकार समाजातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच उद्योग क्षेत्रातील उद्योजक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
चर्मकार संघटनेची भविष्यातील दिशा निश्चित करणे, चर्म उद्योगाला प्रोत्साहन देणे, नवउद्योजकांना मार्गदर्शन करणे तसेच समाजाच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक विविध विषयांवर विशेष कार्यक्रम व मार्गदर्शन या अधिवेशनात होणार आहे.
अधिवेशनासाठी दोन दिवस उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

यावेळी बैठकीमध्ये राष्ट्रीय पदाधिकारी प्रा. शशिकांत सोनवणे, सुदाम अण्णा लोखंडे, प्रदेश पदाधिकारी अंकुश आंबेकर, उत्तरेश्वर कांबळे, दिनेश जाधव, ज्ञानोबा हराळे पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष रवींद्र खैरे, पुणे शहर अध्यक्ष संतोष टोणपे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप शेळके, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा माने तसेच दत्तात्रय शिंदे सरकार, जिल्हा उपाध्यक्ष
कुमार काळे, नितीन कदम, अशोक ठवाळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चर्मकार समाजाच्या संघटनात्मक, औद्योगिक व सामाजिक विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशनाला सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!