spot_img
spot_img
spot_img

दलित पॅंथर संघटनेच्या महाराष्ट्र आघाडीच्या महिला उपाध्यक्षपदी दिना शेखर यांची नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दलित पॅंथरच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी दिना शेखर यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र दलित पॅंथर या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या हस्ते देण्यात आले.
सामाजिक क्षेत्रातील त्यांचा उल्लेखनीय अनुभव तसेच गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व व्यथा समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष आबासाहेब शिंदे,

फरीन सय्यद – संस्थापक अध्यक्ष, आझाद तरखी सेवा; अभिराज राखपसरे – युवा नेते; सुशील नवगिरे – सामाजिक कार्यकर्ते; सुनील आंग्रे – शाखा मार्गदर्शक; संजय पोटभरे – युवा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष; सनी कोरे – पुणे शहराध्यक्ष, वाल्मिकी समाज; कामगार नेते, महाराष्ट्र राज्य; बंडू गवळी – पुणे जिल्हा संपर्कप्रमुख; सोमनाथ साळवे – महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष; संदीप क्षीरसागर – अध्यक्ष, कसबा मतदारसंघ; सचिन क्षीरसागर – अध्यक्ष, रिक्षा संघटना; लक्ष्मीताई गायकवाड – येरवडा विभागप्रमुख, तसेच संजय गायकवाड साहेब, सचिन शेलार, अॅड. आकाश कांबळे, अॅड. सुदेश येरेल्लू, अभिजीत गडांकुश, सुरेश शिंदे यांच्यासह विविध सामाजिक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमास नवनियुक्त महिला पदाधिकारी, शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आशुतोष रविंद्र येरेल्लू यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!