spot_img
spot_img
spot_img

निगडीतील मेट्रो कामामुळे रस्त्याची दुरवस्था; खड्डे तातडीने बुजविण्याची मनसेची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 निगडी येथील मारुती मंदिर ते निगडी सिग्नल या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.

मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी या मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर त्याचा परिणाम होत आहे.

विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असून अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच रस्त्यावरील स्पीड ब्रेकरची रंगरंगोटी पुसट झाल्याने ते वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढून अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मनसेच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, रस्त्याची दुरुस्ती करणे, स्पीड ब्रेकरची रंगरंगोटी करून ते ठळकपणे दृश्यमान करणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!