spot_img
spot_img
spot_img

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले राहुल कलाटे यांचे अभिनंदन!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकार योजना बनवते, परंतु त्या योजना यशस्वीपणे लोकांपर्यंत घेऊन जाणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. योजनेचा फक्त प्रचार पुरेसा नाही, तर त्याची संपूर्ण अंमलबजावणी झाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर येणारे समाधान हीच कोणत्याही लोकप्रतिनिधीची ताकद असते. अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांनी आयोजित केलेल्या लाभार्थी शिबिराचे कौतुक केले. आज (दि. २९ सप्टेंबर) वाकडमध्ये भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे आयोजित लाभार्थी शिबिरात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यावेळी ते बोलत होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या निमित्ताने वाकड येथे ‘लाभार्थी शिबिरा’अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण व प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, “तंत्रज्ञान आणि संवाद यंत्रणांचा उत्तम मेळ घालून राहुल कलाटे यांनी ‘जनकल्याण शिबिर‘ आयोजित केले आहेत. आतापर्यंत कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ६४ शिबिरं आयोजित करण्यात आले आणि त्यातून सुमारे ८५०० हून अधिक लाभार्थ्यांना ते समाधान मिळवून देऊ शकले हे कौतुकास्पद आहे. कारण योजनेची संपूर्ण अंमलबजावणी महत्त्वाची असते.”

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ‘सेवा‘ भावनेने कार्यरत असतात. त्याच विचारांचा पायंडा पुढे नेत नगरसेवक राहुल कलाटे राबवत असलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक वाटते. आपल्या समस्या ऐकून घेणारे कोणीतरी हक्काचे माणूस आहे हा विश्वास आणि दिलासा कलाटे यांच्या कार्यपद्धतीतून इथल्या नागरिकांना मिळतोय याबद्दल खात्री आहे.” असेही चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

“लोकांनी त्यांचे प्रश्न घेऊन आपल्याकडे येणं स्वाभाविक आहे. पण आपण आणि आपले ‘जनसंपर्क कार्यालय‘ थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘जनकल्याण शिबिर‘ उपक्रम सुरू करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा संकल्प सुरु असून, इथे कोणतेही सेवा शुल्क न घेता नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.”, असे राहुल कलाटे यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासोबतच विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘जनकल्याण शिबिरा’च्या माध्यमातून सोसायटी, गावठाण तसे वस्ती भागात आतापर्यंत ६४ हून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून साडेआठ हजारांहून अधिक नागरिकांना विविध योजना, सुविधा आणि आवश्यक मार्गदर्शनाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.


रविंद्र चव्हाण यांचे वक्तव्य:
“सरकार योजना बनवतेच परंतु या योजना यशस्वीपणे लोकांपर्यंत घेऊन जाणे हे लोकप्रतिनिधींचे काम असते. योजनेचा फक्त प्रचार पुरेसा नाही तर त्याची संपूर्ण अंमलबजावणी झाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर येणारे समाधान हीच कोणत्याही लोकप्रतिनिधीची ताकद असते. भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांनी तंत्रज्ञान आणि संवाद यंत्रणांचा उत्तम मेळ घालून जनकल्याण शिबिर आयोजित केले आहेत. आतापर्यंत राहुल कलाटे यांच्या माध्यमातून ६४ शिबिर आयोजित करण्यात आले असून, ८५०० हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचू शकले हे कौतुकास्पद आहे.”

श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि सदस्य यांच्यावतीने श्री रविंद्र चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि वाकड ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी चिंचवडचे आमदार शंकरशेठ जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, गटनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक रेश्मा भुजबळ, कुणाल वाव्हळकर, धर्मपाल तंतरपाळे, श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि सदस्य, लाभार्थी ज्येष्ठ नागरिक, महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!