शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर – जिल्हा अध्यक्षपदी देवेंद्र तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिेंदे यांनी आज श्री. देवेंद्र तायडे यांची नियुक्ती केली, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व पिंपरी- चिंचवडचे पक्ष निरीक्षक सुनील माने यांनी दिली.
पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांनी त्यांना आज नियुक्तीचे पत्र दिले.
याबाबत बोलताना ते म्हणाले, लोकनेते मा.श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने संघटनात्मक अनुभव असलेल्या श्री. देवेंद्र तायडे यांच्यासारख्या चळवळीतून पुढे आलेल्या कार्यकर्त्यावर सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात पक्ष संघटनेला नवी दिशा प्राप्त होईल. त्यांच्या नेतृत्वात आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबुत होऊन कार्यकर्ते आणखी जोमाने पिंपरी चिंचवडच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करतील. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेश सरचिटणीस व आमदार रोहित पवार आणि वरिष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून पक्ष संघटना वाढीसाठी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, असे माने यांनी सांगितले.




Total Users : 226989