spot_img
spot_img
spot_img

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम कायदा राज्यात लागू होण्यापूर्वीच ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची घाई केली आहे या कारवाई प्रकरणी गुन्हा रद्द करावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, ख्रिश्चन आघाडी पुणे शहराध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, पुणे शहर उपाध्यक्ष येशू दोरस्वामी, पुणे शहर सचिव स्टॅनले नॅथन, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, अरुण पवार उपाध्यक्ष पश्चिम, डेनिस सबेस्टीयन सहसचिव घोरपडी, डेव्हिड चांदेकर अध्यक्ष स्वारगेट विभाग,आदी उपस्थित होते.
सदर कलमाची अंमलबजावणी नियमबाह्य पद्धतीने लागू करण्यात आलेली असल्याने पंकज देवणार यांच्यावर अन्याय झालेला आहे तरी सदर गुन्हा रद्द करून न्याय मिळवून द्यावा. अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या अन्याया विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आव्हान पक्षाच्या वतीने देण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!