spot_img
spot_img
spot_img

कोंढवा खुर्द-कौसरबागमध्ये नगरसेविका आसिया मणियार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; मान्यवरांचा पक्षप्रवेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कोंढवा खुर्द-कौसरबाग परिसरातील नगरसेविका आसिया मणियार यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी तथा माजी राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आसिया मणियार यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोंढवा परिसरातील अनेक प्रतिष्ठित व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत कोंढवा परिसरातील अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षात नव्याने दाखल झालेल्या सर्वांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.

नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमामुळे कोंढवा परिसरात काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला आणखी बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!