spot_img
spot_img
spot_img

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल विविध पक्षातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पुणे शहरातील विविध क्षेत्रातील आणि पक्षातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस आयुक्तांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी उत्कृष्ट सेवेबद्दल सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांचाही शिष्टमंडळांनी विशेष सत्कार केला. पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण. अवैद्य धंद्यावरील धडक कारवाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या या च गतिमान आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे पुणे शहर आणि पोलीस दलाचा लौकिक अत्यंत वाढल्याची भावना या सत्कार प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.
या विशेष सत्कार प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक ॲड. आय्युब शेख, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ थेंडे, शिवसेना नेते अजय भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, शिवसेनेचे मिलिंद अहिरे, सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद, आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!