पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
दुकान चालू ठेवायचे असेल तर पाच हजार रुपये दे, अन्यथा दुकान चालू देणार नाही, अशी धमकी देत किराणा दुकानदाराकडून खंडणी उकळल्याची घटना किवळे येथे घडली. याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील आशापुरा सुपर मार्केट परिसरात ११ ऑगस्टच्या सायंकाळपासून १२ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत हा प्रकार घडला. आरोपी पांडुरंग तुकाराम साळुंखे (वय ३२) आणि पवन अभिमान पौळ यांनी दुकानदाराकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास दुकान चालू देणार नाही तसेच ‘बघून घेऊ’, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
धमकीला घाबरून दुकानदाराने ३ हजार ५०० रुपये रोख आणि १ हजार ५०० रुपये पेटीएमद्वारे असे एकूण पाच हजार रुपये आरोपींना दिले. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





Total Users : 213303