पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
कुरुळी (ता. खेड) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना १२ ऑगस्टच्या रात्री ते १३ ऑगस्टच्या पहाटेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव मारुती इगवे (वय ३५, मूळ रा. पिसेगाव, ता. केज, जि. बीड) याला पत्नी प्रियांका हिचे निलेश दिलीप कांबळे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. याच संशयातून महादेवने प्रियांकाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कुरुळी येथील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पिंजारी व पोलीस उपनिरीक्षक जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





Total Users : 213315