spot_img
spot_img
spot_img

सुंदर कांबळे यांची लोक जनशक्ती पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सुंदर कांबळे यांची लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान)च्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर शहरातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, शहरातील प्रमुख चौकांसह विविध भागांत त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर आणि फलक झळकताना दिसत आहेत.

सुंदर कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि कामगार क्षेत्रात सक्रियपणे काम केले आहे. काँग्रेस पक्षात कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)मध्येही त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली.

पिंपरी परिसरातील अनेक झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण मानले जातात. सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. तसेच सुंदर कांबळे यांनी २०२४ची विधानसभा निवडणूकही लढविली होती.

आता लोक जनशक्ती पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अनुभवाचा पक्षाला शहरात विस्तार करण्यासाठी फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये लोक जनशक्ती पार्टीला नवी ताकद मिळण्याची शक्यता आहे.

शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कांबळे यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात असून, शहरभर झळकणाऱ्या शुभेच्छा फलकांमुळे त्यांच्या निवडीची चर्चा सुरू झाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!