पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
मारुंजी (ता. मुळशी) येथे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १३) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील साईरंग डेव्हलपर्सच्या प्लॉटिंगमधील पत्र्याच्या शेडजवळ हा मृतदेह आढळून आला. अज्ञात इसमाने अज्ञात कारणातून संबंधित व्यक्तीच्या हनुवटीवर तसेच डोक्यात कशाने तरी मारहाण करून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताची ओळख पटविण्याचे तसेच खुनामागील कारण आणि आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील व वरिष्ठ पोलिस निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





Total Users : 213303