spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागर येथे आतंरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

२१ जुन हा भारतात आतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन साजरा केला जातो नाना काटे सोशल फाऊडेशन व आर्ट ॲाफ लिव्हिग पिंपळे सौदागर यांच्या वतीने दरवर्षी कुंजीर क्रिडांगण पिंपळे सौदागर येथे सामुहीक योग शिबिराचे आयोजन केले जाते, या वर्षी देखील २१ जुन २०२६ रोजी या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या योग शिबिरात परिसरातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्यंने उपस्थित होते, योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनमूल्ये समाजात रुजविण्याचा या शिबाराचा उपक्रमामागील मुख्य उद्देश असतो.

भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून आज योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून संपूर्ण जीवनशैली बनला आहे. वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता नियमित योगाभ्यासाची गरज अधिक अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाना काटे सोशल फाऊडेशन यांच्या वकीने आर्ट ॲाफ लिव्हिगचा माघ्यमातुन नागरिकांना योगाशी जोडण्याचा दरवर्षी हा संकल्प केला आहे.
यावेळी नागरिकांना संबोधताना नाना काटे यांनी “योग ही भारताची जगाला दिलेली महान देणगी आहे. प्रत्येक नागरिकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून निरोगी आयुष्यासाठी योगदान द्यावे असे आव्हान देखील उपस्थित नागरिकांना नाना काटे यांनी केले या कार्यक्रमावेळी आर्ट ॲाफ लिव्हिगचे दत्ता आलेकर, निशा लुल्ला, उमा कुलकर्णी, शशांक खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल काटे, उमेश काटे, काळुराम कवितके, संतोष मस्कर, संतोष मिश्रा, रवि मुंढे, विनोद सुर्वे,अमरिश जोशी, संदेश घाटे, जयेश सरोदे, दिपक काळे, सतिश डोगंरे, चेतन पाटील, विलास काका जोशी, व परसिरातील सोसायटी मधील नागरिक मोठ्या संख्यंने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!