पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
दिघी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करून सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 284/2026 अन्वये अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, 1956 चे कलम 8 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून 2026 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास मोझे स्कूलसमोरील पुलाखाली, पुणे-आळंदी सर्व्हिस रोडलगत सार्वजनिक ठिकाणी संबंधित महिला आरोपी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करत तसेच शब्द उच्चारून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या या कृत्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होऊन सभ्यतेचा व सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बाळू खळसोडे (पोका 3063), दिघी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून 17 जून 2026 रोजी सायंकाळी 4.55 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोईर व पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.


