spot_img
spot_img
spot_img
spot_img

१२ तासांत खुनाचा उलगडा; दिघी पोलिसांनी आरोपीला संभाजीनगरातून जेरबंद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

दिघी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवघ्या 12 तासांत खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला संभाजीनगर जिल्ह्यातून ताब्यात घेत मोठे यश संपादन केले आहे.

दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 282/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी राजेंद्र लालासाहेब गिलबिले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 16 जून 2026 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक येथे त्यांच्या चुलती शंकुतला काळुराम गिलबिले (वय 75) या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.

घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या नातेवाईकांची चौकशी, परिसरातील नागरिकांकडून माहिती संकलन, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.

तपासादरम्यान संशयित म्हणून मयताच्या शेतात काम करणारा मजूर भगवान दगडुजी पाटील (वय 48, रा. भवानीनगर, कायगाव रोड, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर, सध्या रा. काळजेवाडी, चऱ्होली, पुणे) याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आबा कटपाळे, पोलीस हवालदार तारडे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे व गाडे यांच्या पथकाने संभाजीनगर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास कामुनी, पोलीस उपनिरीक्षक आबा कटपाळे तसेच पोलीस अंमलदार नितीन तारडे, राम बहिरट, राहुल लोणकर, प्रमोद गाडे, नितीन लवटे, राहुल वाघमारे, सुधीर डोळस, सोमनाथ खळसोडे आणि दत्ता मुंढे यांनी सहभाग घेतला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!