spot_img
spot_img
spot_img
spot_img

स्पा सेंटरवरून खंडणीचा खेळ; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

रावेत परिसरातील एका स्पा सेंटरचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत स्पा व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोन नामनिर्देशित आरोपींसह अन्य दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक ज्योतीराम कोल्हापुरकर (वय ३८, रा. म्हाळुंगे) हे रावेत येथील मस्के वस्ती परिसरात स्पा सेंटर चालवतात. आरोपी स्वाती गायकवाड, विष्णू सुरवसे (रा. हडपसर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी स्पा सेंटरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून तेथील व्हिडीओ चित्रित केले. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत स्पा सुरू ठेवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली.

आरोपींनी एकूण ५० हजार रुपयांची खंडणी मागितली असून त्यापैकी ५ हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. तसेच स्पामध्ये आलेल्या एका ग्राहकाकडूनही व्हिडीओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात ५ हजार ५०० रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३२९(४), ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!