पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
मामुर्डी परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका व्यक्तीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईदरम्यान ६१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर, मामुर्डी येथील भोसले यांच्या बांधकाम साईटलगत एका संशयित व्यक्तीकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपीच्या ताब्यातून ३० हजार ५०० रुपये किमतीचा ६१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सुखदेव बाप्पू सोनवणे (वय ५५, रा. साईनगर, मामुर्डी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही आणखी एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.



